ब्राझीलच्या आणखी एका क्लबला आग
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
रिओ दी जानेरियो,
 
ब्राझीलच्या आणखी एका फुटबॉल प्रशिक्षण केंद्राला- बांगू क्लबला आग लागली. या दुर्घटनेत दोन खेळाडूंना दुखापत झाली असून त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची स्थिती धोक्याच्या बाहेर आहे. तीन दिवसांपूर्वीच फ्लेिंमगा युथ फुटबॉल अकादमी या प्रशिक्षण केंद्राला आग लागल्यामुळे १० युवा खेळाडूंचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची हृृदयद्रावक घटना घडली होती.
 

 
 
सुदैवाने बांगू क्लबच्या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. बांगू हे रिओमधील सर्वात जुने व पारंपरिक क्लब असून मिलिटरी ॲथ्लेटिक्स सेंटरमध्ये त्यांचे प्रशिक्षण वर्ग भरतात. दुपारच्या भोजनानंतर ही घटना घडली.