महाराष्ट्रातील खासदारांनी १६व्या लोकसभेत विचारले हजाराहून जास्त प्रश्न
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 

 
 
मुंबई,
 
देशभरातील विविध पक्षाच्या नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहे. या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये आपण कोणती विकास कामे केली, कशी केली आणि ती जनतेसमोर कशी पाहोचवायची ह्याची तयारी जोरात चालू आहे. या रणधुमाळीत राजकीय पक्ष कोणाच्या गळ्यात माळ घालील हे सांगता येत नाही. लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि उमेदवार आपल्याकडे मते मागायला यायला सुरुवात करतील. २०१४ साली राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेल्या महाराष्ट्रातील खासदारांनी तब्बल एक हजाराहून जास्त प्रश्न विचारले आहे.  
 
महाराष्ट्रातून लोकसभेचे ४८ खासदार आहेत, यापैकी काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत घेतलेला आढावा,
  
  • शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना (शिरुर मतदारसंघ) विचारलेले प्रश्न - १०८१
  • आनंदराव अडसुळ, शिवसेना (अमरावती) विचारलेले प्रश्न- १०३८
  • सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (बारामती) विचारलेले प्रश्न- ११६३ 
  • धनंजय महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस (कोल्हापूर) विचारलेले प्रश्न- ११५५ 
  • विजय सिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (माढा) विचारलेले प्रश्न- १११४ 
  • हीना गावित, भाजपा (नंदूबार) विचारलेले प्रश्न- १०७६ 
  • राजीव सातव, कॉग्रेस (हिंगोली) विचारलेले प्रश्न- १०९७ 
 
या खासदारांनी लोकभावनेचा आदर करुन आपली कामगिरी सार्थ ठरवीत, १६ अधिवेशनांत तारांकित आणि अतारांकित मिळून एकूण ७७,३६५ प्रश्न उपस्थित केले गेले. तर, महाराष्ट्राच्या अन्य खासदारांनी २६,७२५ प्रश्न उपस्थित केले.