‘पिंक’नंतर पुन्हा बिग-बी व तापसी पन्नू एकत्र, पहा 'बदला'चा रहस्यमयी ट्रेलर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
‘पिंक’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू ही जोडी एकत्र झळकणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘बदला’ असे असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
 
 
‘बदला लेना हर बार सही नही होता, लेकीन माफ कर देना भी हर बार सही नही होता,’ शा भारदस्त बिग बींच्या आवाजाने या ट्रेलरची सुरुवात होते.
 
या चित्रपटात बिग बी पुन्हा एकदा वकीलाच्या भूमिकेत आहे. तापसीला एका खूनाच्या गुन्ह्यात अडकण्यापासून ते वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. अत्यंत गूढ आणि रहस्यमयी अशी चित्रपटाची कथा असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. त्यातच ‘कहानी’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याने चित्रपटातून फार अपेक्षा आहेत. 
 
 
 
शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटने अजूर एंटरटेन्मेंटसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘बदला’ हा क्राइम- थ्रिलर चित्रपट असणार आहे. त्याची पटकथा लिहिण्यास दहा वर्षांचा काळ लागला असे समजतेय. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.