नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये बरखा साकारणार ‘जशोदाबेन’
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
मुंबई,
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांच्या पत्नीची भूमिका कोण दिसणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. टीव्ही अभिनेत्री बरखा बिष्ट ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात जशोदाबेन यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
 
 
 
 
बरखाने 2005 मध्ये ‘प्यार के दोन नाम, एक राधा एक श्याम’ या िंहदी मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. त्यानंतर काव्यांजली, कसौटी िंजदगी की, कैसा ये प्यार है, नामकरण अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
बरखाने ‘गोलियां की रासलीला राम-लीला’, ‘राजनीती’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केले आहे. टीव्ही अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत बरखाने 2008 मध्ये लगीनगाठ बांधली होती.
 
 
 
चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून निर्मात्यांनी कलाकारांची नावे जाहीर केली आहेत. विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका करणार असून बमन इराणी, झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत असतील.
 
 
 
 
 
सरबजीत, मेरी कोम सारख्या चरित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून संदीप िंसग या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे पोस्टर 7 जानेवारीला 23 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.
 
 
 
 
मोदींच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनातील कोणकोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकांच्या आधी हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.