नूडल्समध्ये निघाले वापरलेले बँडेज; स्विगी अ‍ॅपच्या माध्यमातून मागविले होते जेवण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
चेन्नई
 
चेन्नईतील हरातील बालामुरगन यांनी रविवारी स्विगी अ‍ॅपच्या माध्यमातून एका हॉटेलमधून जेवण मागविले होते. फूड सर्व्हीस कंपनी स्विगीने ही ऑर्डर ग्राहकापर्यंत पोहोचवली. मात्र स्विगीमधून ऑर्डर केलेल्या अन्नामध्ये वापरलेले बँडेज आढळून आले आहे. विशेष म्हणजे या बँडेजवर रक्ताचे डाग सुद्धा दिसत आहेत. शमात्र, निम्मं जेवण झाल्यानंतर या जेवणात बँडेड आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बालामुरगन यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. शहरातील एका रेस्टॉरंटमधून मी चिकन शेजवान नुडल्स मागविले होते. मात्र, या नुडल्समध्ये वापरलेल बँडेज आढळून आल्याच या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. याबाबत संबंधित रेस्टॉरंटला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कुठलेही प्रतिउत्तर मिळाल नाही. याउलट आपण स्विगी अ‍ॅपद्वारेच दुसऱ्यांदा जेवणाची ऑर्डर करण्याचा पर्याय सूचविण्यात आला. मात्र, स्विगीशीही थेट फोनद्वारे संपर्क होऊ शकत नव्हता. त्यामुळे केवळ अ‍ॅपद्वारे चॅटिंग करुनच ही तक्रार सांगण्याचा पर्याय माझ्याकडे असल्याचे बालामुरगन याने म्हटले.  दरम्यान, स्विगी आणि संबंधित हॉटेलमध्ये ग्राहकांच्या जेवणाची किती काळजी घेतली जाते, हा खरा प्रश्न आहे. तसेच, जेवण बनवणारे आचारी हँडग्लोज वापरतात का, स्विगीचे कर्मचारीही तशी काळजी घेतात का, असा प्रश्नही या फेसबुक पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे.
स्विगी अ‍ॅप वापरकर्त्यांनी याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे. तर संबंधित रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनीही ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाबाबत सतर्क असावे. तसेच स्विगीनेही आपल्या अॅपच्या माध्यमातून अन्नसेवा पुरविणाऱ्या रेस्टॉरंटची निवड करताना, योग्य ती काळजी आणि खात्री करणे, आवश्यक असल्याचे बालामुरगन यांनी म्हंटले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप स्विगीकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचे मुरगन म्हणाले.