कम्युनिस्टांनी घडविलेला ‘मरीचजपी’ नरसंहार!
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
14 मार्च 2007 रोजी पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम झाले होते. नंदिग्रामच्या घटनेला आपण सामूहिक िंहसाचार म्हणत असलो, तर 1979 च्या जानेवारी महिन्यात याच राज्यातील मरीचजपी (आजचे नेताजीनगर) येथे झालेल्या हत्याकांडाला िंहसाचाराची जननीच म्हणावे लागेल! इतिहासाला कधी मरण नसते आणि तो उलगडला गेला, तर त्यात भल्याभल्यांची भंबेरी उडण्याची शक्यता असते. इतिहासाच्या पानांमध्ये इतकी ताकद असते की, त्यामुळे सत्तादेखील उलथवून टाकली जाऊ शकते! आज आपण अशाच एका, इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या महाभयानक नरसंहाराबद्दल चर्चा करणार आहोत.
 
 
 
 
 
 
 
डाव्या विचारसरणीत, धर्म ही अफूची गोळी आहे, हे सातत्याने सांगितले जाते आणि समानतेच्या घोषणा देत भांडवलदारांविरुद्ध संघर्ष पुकारला जातो. लक्ष्य गाठण्यासाठी िंहसाचाराचा मार्गही निवडला जातो. मात्र, ना समता प्रस्थापित होते, ना दबल्या-पिचलेल्यांना न्याय मिळतो. दुसरीकडे डाव्या विचारसरणीची मंडळी आपण किती पुरोगामी, सुधारणावादी आणि उदार आहोत, हे दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. पण, ही मंडळी किती क्रूर, नीतिमत्ता नसलेली आणि तत्त्वांना तिलांजली देणारी आहे, हेच सोबतची घटना दर्शविते आणि डाव्या विचारांचा हिडिस, िंहस्र चेहरा उघडा पडतो. 1947 ला भारताची फाळणी झाल्यानंतर बंगालमधील काही िंहदू पाकिस्तानात (सध्याचे बांगलादेश) आश्रयार्थ गेले. आर्थिकदृष्ट्या संपन्न िंहदूंनी तेथे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले, पण मागास दलित िंहदूंना तेथे स्वीकारले गेले नाही. 1970 च्या दशकात बांगलादेशातील हे िंहदू तेथे झालेल्या प्रचंड अत्याचारामुळे पराभूत होऊन जिवाच्या आकांताने भारताच्या सीमेपर्यंत आले. बांगलादेशात िंहदूंना किती असह्य वागणूक मिळते, याचे चित्रण तस्लिमा नसरीन यांच्या ‘लज्जा’ कादंबरीत अतिशय योग्य पद्धतीने केले आहे. आपला देश सोडून शरणार्थी म्हणून आलेल्या या लोकांनी पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा राज्यातील काही ठिकाणी आश्रय घेतला. पण, हळूहळू त्यांची लोकसंख्या वाढू लागल्याने भारत सरकारने त्यांच्या राहण्याची व्यवस्था दंडकारण्य आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये केली. यासाठी अधिकृतपणे दंडकारण्य विकास समितीची स्थापना करण्यात आली आणि त्यांच्या हितांचे रक्षण केले जाऊ लागले. पण, यातील बहुतांश लोक पश्चिम बंगालमध्ये आश्रयाला आले. यातील एक भाग ‘मरीचजपी’ हादेखील होता. हेच शरणार्थी डाव्या राजवटीला खुपले आणि त्यांना हुसकावून लावण्यातून अचानक ती घटना घडली, ज्यामुळे भारताच्या इतिहासाची पाने काळ्या अक्षरांनी लिहिली जावी.
 
 
 
 
 
तो दिवस होता 31 जानेवारी 1979 आणि पश्चिम बंगालमध्ये शासन होते कम्युनिस्टांचे. राज्याचे मुख्यमंत्री होते ज्योती बसू. अचानक बंगाल पोलिसांनी शरणार्थींना घेराव घातला आणि त्यांच्यासोबत आलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी शरणार्थींवर, हा भाग रिकामा करण्यासाठी जोरजबरदस्ती सुरू केली. ‘‘तो दिवस सरस्वती पूजेचा होता. पोलिस त्यांच्यावर बंदुकांमधून अंदाधुंद गोळीबार करीत होते. रस्त्यावर पळापळ सुरू झाली. सार्‍यांबरोबर मीदेखील पळू लागलो. लोक किड्या-मुंग्यांसारखे रस्त्यावर मरून पडत होते िंकवा जखमी होऊन विव्हळत होते, हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो.’’ असे नीताल मंडल सांगत होता. नीताल माकपच्या कुमिरमारी स्थानिक समितीचा पदाधिकारी आहे. आज या घटनेला 40 वर्षे झाली, पण त्याबद्दल कुणीही अवाक्षर काढायला तयार नाही. असे सांगितले जाते की, पोलिस गावात प्रवेश करताच अंदाधुंद गोळीबार करू लागले. ते एकेका शरणार्थीला पकडून टिपत होते, त्यांची हत्या करीत होते. काहींनी नदीच्या मार्गाने जाऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना मोटरबोटने पाठलाग करून यमसदनी पाठवण्यात आले. 15 निर्दोष मुले, जी सरस्वती पूजेच्या तयारीत व्यग्र होती, गोळ्यांच्या आवाजाने घाबरीघुबरी झाली, लपून बसली. त्या निरपराध मुलांनाही पोलिसांनी गोळ्यांनी टिपून काढले. या मुलांनी साधे दहा वसंतदेखील योग्य रीत्या बघितले नव्हते. या मुलांची हत्या केल्यानंतर परिसरातील सरस्वतीची मूर्ती कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी तोडून टाकली. 100 हून अधिक शरणार्थी महिलांवर अनेकवार बलात्कार करून, त्यांनाही मारून टाकण्यात आले. बंगाल पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्यांची संख्या 1600 सांगितली जाते आणि यात बहुतांशी महिलांचा समावेश होता.
मरीचजपीत जो भीषण नरसंहार झाला, त्यामुळे घाबरून जाऊन िंहदू शरणार्थी आपल्या देशात परतण्यासाठी माघारी फिरले. पण वाटेत भूक, महामारी आणि इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे तब्बल 4200 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
ज्योती बसू यांच्या कार्यकाळात झालेल्या या नरसंहाराच्या बातम्या ना कुठे झळकल्या, ना कोणी त्यावर प्रकाश टाकण्याचे धैर्य दाखवले. पत्रकारांना तर या भागात जाण्यास मनाईच करण्यात आली होती. त्यामुळेच इतिहासाच्या कुठल्याच पुस्तकात या नरसंहाराची साधी नोंदही झाली नाही. या संदर्भातील विस्तृत माहिती अमिताभ घोष यांच्या ‘द हंग्री टाईड’ या पुस्तकात वाचली जाऊ शकते. आज या घटनेवरून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. मरीचजपीचे नाव बदलून नेताजीनगर (थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद िंहद फौजेचे जनक सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने) करण्यात आले आहे. शेकडो मृतांच्या राखेवर वसलेल्या या शहराचा कायापालट झाला असून, कालच्या गल्ल्यांचे आज हमरस्ते झाले आहेत. शाळा, आरोग्यसुविधा केंद्र, डांबरी रस्ते, आरोग्य केंद्रे आणि बेकरी, हॉटेल्स, दिव्यांचा झगमगाट असा बदलाव आलेला आहे.
 
 
 
 
मरीचजपी बेटावर राहणार्‍या पूर्वीच्या पाकिस्तानातील निर्वासित आणि गावातील निर्दोष रहिवाशांना सुंदरबनचा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मारण्यात आले, असे सांगितले जाते. या नरसंहारात किती जणांचा मृत्यू झाला, याची पुष्टी कधीच होऊ शकणार नाही. पण, मृतांचा आकडा हजारावर होता, असे सांगितले जाते. सरकारदरबारी मात्र या घटनेतील मृतांची नोंद 2 असल्याचे नमूद आहे.
 
 
 
 
अनेकांना सफालंदा हलधरा याची कहाणी माहीत असावी. हा निर्वासित पोलिसांच्या गोळीबारातून कसाबसा बचावला आणि कोरानखाली नदी पोहून कुमिरमारीला पोहोचला. तेथे त्याची भेट एका पत्रकाराशी झाली. त्याने त्याला सांगितलेली आपबिती दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आणि बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली.
 
 
 
 
यानंतर सफालंदा हलधरासारख्या अनेक व्यक्ती आढळल्या. पण, पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या भीतीने कुणीही तोंडातून ब्र काढण्यास पुढे आला नाही. पण, काळाबरोबर अनेक बदल झाले. काल या सामूहिक हत्याकांडाबाबत अवाक्षरही काढायला तयार नसलेली मंडळी, आज स्वतःहून बोलायला पुढे येत आहेत.
 
 
 
 
पश्चिम बंगालच्या इतिहासात जर आपण डोकावलो तर राजकीय िंहसाचाराच्या अनेक घटना दृष्टिपथात येतील. सैनबारी, नुन्नोट, िंसगूर असो की नंदिग्राम, िंहसाचाराचे हे हिडिस दर्शन जगाला झालेले आहे. सार्‍या देशात अस्थिरता निर्माण करणार्‍या नक्षलवादाचा जन्मदेखील पश्चिम बंगालमध्येच झाला. मरीचजपी हत्याकांडाची तुलना केवळ जालियानवाला बाग हत्याकांडाशीच केली जाऊ शकते! मरीचजपीतील पोलिसांचे क्रौर्य भयानक होते. डाव्या विचारांच्या नेतृत्वाने शरणार्थींची आधी नाकाबंदी केली आणि त्यानंतर लोकसंख्या कमी करीत त्यांच्या हत्यांना प्रारंभ केला.
 
 
 
 
सुरुवातील त्यांना हा परिसर सोडून देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांची जबरदस्तीनेहकालपट्‌टी करण्यात आली. त्यांना हुसकावून लावताना महिलांना पुरुषांपासून वेगळे करण्यात आले. युवा मंडळींना कारागृहात डांबण्यात आले, महिलांवर अनन्वित शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि शेकडो लोकांच्या हत्या करून मृतदेह नदीत फेकून देण्यात आले. आज 40 वर्षांपूर्वीचे हे हत्याकांड चर्चेत आल्याने कम्युनिस्ट वृत्तीचा पुनःप्रत्यय आला.