डॉली बिंद्राविरोधात गुन्हा दाखल
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
आपल्या अभिनयापेक्षा वादांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री डॉली बिंद्राविरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी डॉली बिंद्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात डॉली बिंद्राला लवकरच नोटीस बजावण्यात येणार असून तिची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
 

 
अभिनेत्री डॉल बिंद्रा ही वादामुळे नेहमीच चर्चेत असते. आता पोलीस ठाण्यात डॉलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे आणि धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिक्रमण करणे, अब्रूनुकसानीकारक मजकूर वितरित करणे, धमकी देणे, शांतताभंग करणे अशा विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉली बिंद्राविरोधात यापूर्वी राधे माँने देखील कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बिंद्राला नोटीस देऊन लवकरच खार पोलीस चौकशी करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.