' केसारी ' चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारीत ‘केसरी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या त्या २१ सैनिकांची अविश्वसनीय अशी शौर्यगाथा केसरीतून रुपेरी पड्यावर पहायला मिळाणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक अक्षयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सारागढीच्या युद्धातील एक छोटसे दृश्य अक्षयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.  अक्षय सोबत या चित्रपटात परीणिती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
सारागढीच्या युद्धाविषयी आजवर बऱ्याच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातही या युद्धाविषयी बरेच उल्लेख पाहायला मिळतात. आतापर्यंत लढलेले हे इतिहासातील सर्वात धाडसी युद्ध होते , अश्या शब्दात अक्षयने याचे कौतुक केले आहे. २१ मार्च रोजी केसरी प्रदर्शित होत आहे.