खेक गावात पुन्हा वाघाने गोठ्यात शिरून गायीचा फडश्या पाडला
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
- गावात वाघाच्या धुमाकूळाची मालिका कायम
गिरड,
कोरा परिसरातील खेक गावात पुन्हा एकदा वाघाने गोठ्यात शिरूर गायची फडश्या पाडला आहे. धामणगाव येथे तीन दिवसापुर्वी वाघाने गावाशेजारील गोठ्यात शिरकाव करून १० बकऱ्यांना ठार केल्याची घटना घडली होती. या वाघाने दुसऱ्या दिवशी या गावात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नागरीकांनी फटाके फोडुन त्याला जंगलात पांगविले होते.
 
 
 
वाघाच्या धुमाकूळाची मालिका कायम असून १२ फेब्रुवारीला त्याच परिसरातील खेक शिवारात शिरकाव करीत पहाटेच्या सुमारात खेक येथिल विष्णू अभिमान लोखंडे यांच्या गावाशेजारील गोठ्यात शिरून गोठ्यात बांधुन असलेल्या जनावरांपैकी एका गायीचा फडशा पाडला. या घटनेची माहीत मिळताच कोरा जिल्हा परिषद सदस्य रोशन चौके, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर कोरा येथिल क्षेत्र सहाय्यक जी. वी. भउर, वनरक्षक के. व्ही. शिंदे, यांनी पंचनामा केला डॉ.पी. एस. दोडके,यांनी शवविच्छेदन केले.