परिणीती चोप्रा दिसणार दाक्षिणात्य चित्रपटामध्ये
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
बॉलिवूडमधील अनेक कलाकार विविध भाषांमध्ये काम करत आहे. आता अभिनेत्री परिणीती चोप्राच्या नावाचा समावेश या यादीत झाले आहे. ती लवकरच 'रामा रावणा राज्यम' या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम करणार असल्याचे कळले. 
'रामा रावणा राज्यम' या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मौली करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात परिणीती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत दाक्षिणात्य हिरो राम चरण स्क्रीन शेअर करणार आहे. परिणीती मार्च महिन्यापासून चित्रीकरणाला सरुवात करणार आहे.
'रामा रावणा राज्यम' हा चित्रपट तेलगु,तामिळ,हिंदी आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. राम चरण आणि परिणीती शिवाय चित्रपटात ज्युनिअर एनटीआर देखील असणार आहे.