राफेल समजून दाखवला एअरबस व्यवहाराचा ई-मेल; राहुल गांधी पुन्हा तोंडघशी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :12-Feb-2019
 
 
 
 
 

 
 
नवी दिल्ली,
 
 
 
 
राफेल फोबियाने ग‘ासलेले कॉंगे‘सचे अध्यक्ष राहुल गांधी आज मंगळवारी पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी आज त्यांनी पत्रपरिषदेत एक ई-मेल सादर केला आणि राफेलमध्ये घोटाळा झाल्याचा हा आणखी एक पुरावा असल्याचे सांगून, मोदी यांना तुरुंगातच पाठवायला हवे, असे राहुल गांधी उत्साहाच्या भरात बोलून गेले; पण हा ई-मेल राफेलशी संबंधित व्यवहाराचा नसून, एअरबस आणि रिलायन्स डिफेन्स यांच्याशी संबंधित असल्याचे ठोस पुरावेच भाजपाने सादर केले. यामुळे राहुल गांधी यांची चांगलीच नाचक्की झाली.
 
 
 
राहुल गांधी यांच्या पत्रपरिषदेनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रपरिषद घेऊन, त्या ई-मेलचा पंचनामा केला. राहुल गांधी यांनी खोटारडेपणाच्या सर्वच सीमा पार केल्या आहेत. अतिशय बेजबाबदारपणे आणि निर्लज्जपणे ते खोटे बोलत आहेत. राफेलचे नाव घेऊन त्यांनी जो ई-मेल दाखविला, तो मूळातच एअरबस आणि रिलायन्स डिफेन्स यांच्यातील व्यवहाराचा आहे, राफेल फोबियाने ग‘ासलेल्या राहुल गांधींना राफेल आणि मोदी यांच्याशिवाय दुसरे कोणतेच भान राहिले नाही. उत्साहाच्या भरात आपण दाखवत असलेला ई-मेल नेमका काय आहे, हे तपासण्याचाही त्यांना विसर पडला, असा जोरदार हल्ला रविशंकर प्रसाद यांनी चढविला.
 
 
 
प्रसाद यांनी यावेळी एअरबसलाही आरोपीच्या िंपजर्‍यात उभे केले. पूर्वीच्या संपुआ सरकारच्या काळातील काही संरक्षण व्यवहारांमध्ये झालेल्या प्रचंड भ‘ष्टाचारात एअरबस ही कंपनीदेखील सहभागी असल्याची दाट शक्यता असून, भारतीय तपास संस्था या कंपनीच्या भूमिका तपासून पाहात आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
 
 
ज्या एअरबसची देशांतर्गत चौकशी सुरू आहे, त्या कंपनीतील अंतर्गत पत्रव्यवहाराचा ई-मेल राहुल गांधी यांना कसा प्राप्त झाला, याचे उत्तर त्यांनी देशाला द्यायलाच हवे, असे सांगताना, विदेशी कंपन्यांचे लॉबिस्ट म्हणून राहुल गांधी काम करीत असल्याचा आरोप प्रसाद यांनी केला.
 
 
पंतप्रधान मोदी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करताना राहुल गांधी यांनी थोडा तरी विचार करायला हवा होता. गांधी घराण्यातून आलेल्या अनेक पंतप्रधानांसोबत भाजपाचे मतभेद होते, त्यांच्या कार्यकाळातही अनेक संरक्षण व्यवहारांमध्ये मोठमोठे घोटाळे झाले, पण त्यांच्यासाठी आम्ही अशा प्रकारचे शब्द कधीच वापरले नाहीत. राहुल गांधी यांचा खोटारडेपणा आता आम्ही जनतेसमोर आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
 
काय म्हणाले होते राहुल
 
तत्पूर्वी, आज सकाळी पत्रपरिषद घेत एक ई-मेल दाखविला आणि राफेल करार होण्यापूर्वीच अनिल अंबानी यांनी फ‘ान्सच्या संरक्षण मंत्र्याची भेट घेतल्याचा आरोप केला. पंतप्रधान मोदी अनिल अंबानींचे एजंट म्हणून काम करीत असून, त्यांचे हे कृत्य देशद्रोहाचे आहे आणि यासाठी त्यांना तुरुंगातच डांबायला हवे, असे ते म्हणाले होते.
जी बाब संरक्षण मंत्र्यांना माहीत नाही, जे एचएएलला माहीत नाही, परराष्ट्र सचिवांना ज्याची कल्पना नाही, ते अनिल अंबनींना कसे माहीत, असा सवाल करताना, पंतप्रधांनांनी गुप्ततेचा भंग केला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. जे काम गुप्तचर करतात, ते काम मोदींनी केले. त्यांनी संरक्षण संबंधीची माहिती दुसर्‍यांना उपलब्ध केली, जी गुप्त ठेवण्याची त्यांनी शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदींनी देशाला धोका दिला आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
.