दुचाकी अपघातात दोन ठार.
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
कारंजा (घाडगे),
तालुक्यातील धर्ती येथे दुचाकीला झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दुसरा दवाखान्यात मरण पावल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.बांगडापूर येथील रामभाऊ मारोती धाडसे हा व्यक्ती जागीच ठार झाला तर त्याचेसोबत असलेला दुसरा व्यक्ती दुचाकीचालक विवेक लक्ष्मण करनाके हा कारंजा येथे ग्रामिण रूग्णालयात मरण पावला.
 
 
 
 
सावरगाव वरून काटोल मार्गे दुचाकी क्र. एमएच३२एफ ७२३१ ने दोघेही बांगडापूर येथे गावाला जात होते. दुचाकी धर्तीजवळ येताच गावाजवळील लहान पुलावर जोरदार धडकली,त्या धडकीत दोघेही फेकल्या गेले त्यातच रामभाऊ धाडसे रा. बांगडापूर हा इसम जागीच ठार झाला तर दुसरा विवेक लक्ष्मण करनाके याला जखमी अवस्थेत कारंजा ग्रामीण रुग्णालयात आणले असता तो मरण पावला. दोन्ही मृतक बांगडापूर येथील रहिवासी असून पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.