अमरावतीच्या ५ खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019

अमरावती, 
 
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मार्फत सन २०१७-१८ या वर्षातील श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातल्या पाच जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 

 
 
अमरावतीची उत्कृष्ठ खेळाडू म्हणून दिक्षा प्रदिप गायकवाड (वेटलिफ्टींग), चेतन गिरीधर राऊत (जलतरण), स्वप्नील सुरेश धोपाडे (बुध्दीबळ), उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक म्हणून डॉ. लक्ष्मीकांत माणिकराव खंडागळे (वाटरपोलो), उत्कृष्ठ संघटक कार्यकर्ता म्हणून डॉ. नितिन गणपतराव चव्हाळे यांच्या कार्याची दखल घेऊन क्रीडा विभागाचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. 
 
 
 
पुरस्काराचे स्वरुप रु. १ लक्ष, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सन्मान पत्र असे आहे. पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे क्रिडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, नरेश बुंदेले अभिनंदन केले आहे.