राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 • मेष : आज आशा- आकांक्षा पूर्ण होण्याचा दिवस आहे. दिलेले काही घेणेकर्‍यालाच आठवेल. देवाचे स्मरण करा.
 • वृषभ : अशा घटना घडतील की आत्मविश्वास दुणावेल. शारीरिक व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. सूर्याला नमस्कार करा.
 • मिथुन : अनोळखी व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. सावध असा. आज गायीला घास घाला.
 • कर्क : मनात घालमेल असेल. अस्वस्थ वाटले तर दुर्लक्ष करू नका. इष्ट देवतेचे स्मरण करून जपमाळ ओढा.
 • सिंह : पारिवारिक मंगल सोहळ्यात सहभागी व्हाल. खर्च होईल. कुत्र्यांना खायला घाला.
 • कन्या : आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. कुठेही सह्या करू नका. सरस्वतीचे स्तोत्र रात्री झोपताना म्हणा.
 • तूळ : चांगल्या संधी न सांगता दाराशी येतील. त्याचे तुम्ही नक्कीच सोने करणार आहात. उजव्या हाताने दान करा.
 • वृश्चिक : अनेक दिवसांपासून मनात योजलेली काम मार्गी लागतील. वस्त्र खरेदी कराल. आर्थिक दान करा.
 • धनू : धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. पैसेही खर्च कराल. बालाजीला अभिषेक करा.
 • मकर : अडचणी येतील मात्र, त्यावर मात कराल. पिवळ्या रंगाची वस्त्री परिधान करा.
 • कुंभ : कुणाच्या मधात पडू नका. नाकासमोर पाहून दिवस घालवा. मारोतीची उपासना करा.
 • मीन : अचानक धनलाभ झाल्याने आर्थिक प्रतिष्ठा वाढेल. कुणी दिलेले काही घेऊ नका. विष्णूला तुळस वहा.