अखेर टायगरला हिरोईन मिळाली! ‘बागी ३’ मध्ये श्रध्दा कपूर
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
मुंबई , 
 
'बागी ३' मध्ये अभिनेता टायगर श्रॉफला अखेर हिरोईन मिळाली आहे.  चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार या चर्चांना उधाण आले होते. अखेर आता अभिनेत्री श्रध्दा कपूरच्या नावावर ‘बागी ३’ची नायिका म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. ‘बागी’ चित्रपटाच्या पहिल्या भागात झळकलेली श्रध्दा आणि टायगरची जोडी पुन्हा एकदा आपल्या केमिस्ट्रीचे जलवे दाखवायला सज्ज झाली आहे.
 
 
‘बागी’च्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनापूर्वीच निर्माते सादिद नाडियाडवाला यांनी ‘बागी ३’ची घोषणा केली होती. ‘बागी’ आणि आगामी 'छिछोरे'नंतर श्रध्दाचा साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत हा तिसरा चित्रपट आहे. श्रध्दा कपूर म्हणते," मी बागी कुटुंबासोबत पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी खूप उत्साही आहे. टायगरबरोबर पुन्हा काम करायला मिळतेय याचा आनंद आहे. साजिद सरांसोबत हा माझा तिसरा आणि अहमद सरांसोबत पहिलाच सिनेमा आहे. ‘बागी ३’ची स्क्रीप्ट अफलातून आहे. त्यामुळे या संपूर्ण टीमसोबत काम करायला मजा येणार."
‘बागी ३’ हा चित्रपट पुढील वर्षी ६ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.