ऑलिम्पिकपूर्वी विश्वविक्रम रचण्याचे ध्येय : मीराबाई
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
नवी दिल्ली, 
 
आगामी काळात अथक परिश्रम करून टोकियो ऑलिम्पिकपूर्वी २१० किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. यात मी यशस्वी झाली, तर ऑलिम्पिकपूर्वीच विश्वविक‘म माझ्या नावावर होईल, असे भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू म्हणाली.
दुखापतीतून सावरल्यानंतर मीराबाईने थाटात पुनरागमन केले असून सध्या ती सरावादरम्यान अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न करीत आहे.
 

 
 
विश्वविक्रम नोंदविण्याचे ध्येय गाठणे सोपे नसले तरी त्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार आहे, असे विश्व स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती मीराबाई म्हणाली.
 
पाठीच्या दुखापतीमुळे आठ महिने खेळू न शकलेल्या मीराबाईने गेल्या आठवड्यात थायलंड येथे झालेल्या ईजीएटी चषक स्पर्धेत १९२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. ४९ किलो वजनी गटात लढणार्‍या मीराबाईने प्रतिस्पध्र्याना धूळ चारण्यासाठी अधिकाधिक वजन उचलण्याचे ध्येय बाळगले आहे. आता ४९ किलो वजनी गटात खेळताना प्रतिस्पर्ध्यांकडून कडवे आव्हान मिळणार आहे. लवकरच २०० किलो वजन उचलून सर्वांना चकित करण्याच्या विचारात असल्याचेही ती म्हणाली.