निवडणुकीत ट्रम्पविरोधात पाच महिला उमेदवार शर्यतीत
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी निवडणुकीतही महिला उमेदवारच प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पाच महिला आतापर्यंत व्हाइट हाउसच्या शर्यतीत आहेत. 
मिनिसोताच्या सिनेटर अॅमी क्लॉबुचर आणि मॅसॅच्युसेट्सच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी औपचारिकरीत्या अध्यक्षपदासाठीच्या प्रचारमोहिमांची घोषणा गेल्या आठवड्यात केली. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस, न्यूयॉर्कच्या सिनेटर कर्स्टन गिलिब्रँड आणि हवाईच्या काँग्रेसच्या प्रतिनिधी तुलसी गॅबार्ड यादेखील अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या महिलांना अध्यक्षपदाच्या शर्यतीत रस दाखवला आहे. ट्रम्प यांना आव्हान देण्यापूर्वी या महिलांना परस्परांविरोधात आणि पक्षातील इतर नेत्यांविरोधात तिकीट मिळविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.