रिलायन्सचे पहिले स्मार्ट फिनटेक सेंटर महाराष्ट्रात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
मुंबई :
 
रिलायन्स रियालिटी कंपनी महाराष्ट्रातील पहिले आणि मोठे फिनटेक सेंटर मुंबईत सुरू करणार आहे. रिलायन्स रियालिटी ही रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या मालकीची कंपनी आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने फिनटेक सेंटर सुरू करण्याला मान्यता दिली आहे. हे सेंटर नवी मुंबईमधील धिरुबाई अंबानी नॉलेज सिटीमध्ये असणार आहे. हे नॉलेज सेंटर 132 एकरमध्ये असेल. बांद्रा कॉम्लेक्समधील जागेपेक्षा हे कार्यालय दुप्पट असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.