अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत बॉलिवूड कलाकारांचा सहभाग
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
आध्यात्मिक गुरू श्री श्री रवी शंकर येत्या १८ फेब्रुवारीपासून ‘ड्रग फ्री इंडिया’ ही अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेला सुरुवात करत आहेत. देशभरात ही मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये मोठमोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश असणार आहे. संजय दत्त, कतरिना कैफ, आमिर खान, विकी कौशल, आयुष्मान खुराना, कपिल शर्मा, अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा असे अनेक बॉलिवूड कलाकार अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
ही राष्ट्रव्यापी मोहीम १८ फेब्रुवारीला पंजाब तर १९ फेब्रुवारीला हरियाणा येथून सुरुवात होणार आहे. दोन्ही दिवशी जवळपास ६० हजार विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग असणार आहे. इतकेच नाही तर देशभरातील हजारोंच्या संख्येतील विद्यार्थी लाइव्ह ब्रॉडकास्टच्या माध्यमातून यात सहभागी होतील. हे सर्व विद्यार्थी आणि इतर लक्षावधी लोक अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध प्रतिज्ञा घेणार आहेत.
 
 
 
 
 
 
 
अमली पदार्थांचा सूड घेण्याचा हा माझा मार्ग आहे, असे संजय दत्त या मोहिमेत सहभागी होताना म्हणाला. तर भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि आजच्या तरुण पिढीचा सर्वात मोठा शत्रू अंमली पदार्थ आहेत. याविरुद्ध लढा देण्यासाठी मी तयार आहे, असे अभिनेता वरुण धवन म्हणाला.