रशिया, चीनपासून अमेरिकन उपग्रहांना धोका - पेंटॉगॉन यांचा इशारा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
वॉशिंग्टन,
रशिया आणि चीन हे दोन्ही देश अंतरिक्षातील आपल्या क्षमता वाढवत असून त्यांच्यापासून अमेरिकेला लेजर शस्त्रांसह अनेक प्रकारचा धोका वाढत आहे. लेजरमुळे अमेरिकन उपग्रहांना नष्ट केले जाऊ शकते, असा इशारा अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटागॉनने दिला आहे.
 
 
 
 
 
रशिया आणि चीन हे अमेरिकेला अंतरिक्षात आव्हान देण्यासाठी खास तयारी करत असल्याची माहिती अमेरिकेचा गुप्तचर संस्थांनी दिली आहे. रशिया आणि चीन तयार करत असलेल्या उपग्रहविरोधी प्रणाली, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीआदींच्या माहितीबरोबरच ऊर्जानिर्देशित शस्त्रे, कायनॅटिक अँटिसॅटेलाईट मिसाईल्स आदींची माहिती अहवालात देण्यात आलेली आहे. अमेरिकन उपग्रहांना निकामी करण्यासाठी रशिया आणि चीन लेजर शस्त्रे तयार करण्याच्या प्रयत्नात असून चीन 2020 मध्ये जमिनीवरून अंतरिक्षात मारा करणारी शस्त्रे तैनात करण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अंतरिक्षातील सुरक्षा आव्हाने या नावाने सादर केलेल्या गुप्त अहवालात रशिया, चीन इराण, आणि उत्तर कोरिया यांच्या अंतरिक्ष क्षमतांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. अमेरिकेचे उपग्रह हे जलपर्यटन, शस्त्रास्त्रांच्या शोधाप्रमाणेच उत्तर कोरियाचे आण्विक कार्यक्रम आणि रशिया, चीनची लष्करी माहिती मिळवण्याचेही काम करतात. शिवाय शत्रू राष्ट्रांच्या प्रक्षेपास्त्र परीक्षणांचीही माहिती मिळवण्यास अगे्रसर असतात.