मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या वाशीममध्ये - 300 कोटीच्या विकासकामाचे करणार लोकार्पण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
वाशीम,
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे उद्या 14 फेब्रुवारी रोजी वाशीम येथे येणार असून, या दौर्‍यानिमीत्त ते वाशीम शहर व जिल्ह्यातील 300 कोटीच्या विकासकामाचे लोकार्पण करणार असून, याशिवाय नविन 600 कोटीच्या विकासकामाचे भूमीपुजन करणार आहेत. त्यानिमीत्त येथील वाशीम येथील टेम्पल गार्डन येथे सभा होणार असून, या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष अशोक हेडा, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी केले आहे.
 
 

 
 
 
या सभेला विशेष अतिथी म्हणून महसूल राज्यमंत्री तथा वाशीमचे पालकमंत्री संजय राठोड, गृह तथा नगरविकास मंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे, खासदार भावना गवळी, जिप अध्यक्षा हर्षदाताई देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार निलय नाईक, आमदार अमीत झनक, आमदार तानाजी मुटकुळे आदीसह खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती लाभणार आहे. लोकार्पण सोहळा कार्यक्रमामध्ये वाशीम येथील नगर परिषद प्रशासकीय इमारत, पाणी पुरवठा योजना, नगर परिषद व्यापारी संकुल, ग्रंथालय अधिकारी कार्यालय, शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, भूमिगत गटार योजना, उपजिल्हा रुग्णालय कारंजा, पशुवैध्यकिय इमारत कारंजा, रिसोड येथील प्रशासकीय इमारत अशा विविध कामाचे लोकार्पण होणार आहे.त्याच बराबर सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी, जलसंधारणाची कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, या विविध कामांसाठी कोट्यावधी रुपयांच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे.
 
 
 
 
या विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला वाशीम जिल्ह्यातील जनतेने, मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन, प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी केले आहे.