ट्रम्प तुरुंगात जाऊ शकतात : एलिझाबेथ वॉरेन
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :13-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
वॉिंशग्टन,
 
 
कार्यकाल समाप्त होण्यापूर्वी अर्थात पुढील वर्षांपर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प तुरुंगात जाऊ शकतात, असा दावा रिपब्लिकन पक्षाच्या सदस्या एलिझाबेथ वॉरेन (69) यांनी केला आहे.
 
 
एलिझाबेथ वॉरेन यांनी 2020च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली उमेदवारी औपचारिकरीत्या जाहीर केलेली आहे. वॉरेन यांच्या एका टि्‌वटवर ट्रम्प यांनी टीका केल्यानंतर वॉरेन यांनी वरील वक्तव्य केले आहे. या संबंधात त्यांनी ट्रम्प यांच्या विरोधात चाललेल्या अनेक चौकशांचा संदर्भही दिला आहे. खास करून वकील रॉबर्ट मु‘र करत असलेल्या रशियासंबंधित प्रकरणासह अन्य दोन प्रकरणांबाबत त्यांनी भाष्य केले. आपण 2020 मध्ये प्रवेश करू, तेव्हा डोनॉल्ड ट्रम्प यांनी स्वत:चे स्वातंत्र्य गमावलेले असण्याची शक्यता आहे, असेही त्या ठामपणे म्हणाल्या. दरम्यान, ट्रम्प आणि वॉरेन यांच्यातील संबंध दीर्घकाळासून तणावपूर्ण असल्याचे दिसून येते.