सन्नीच्या मुलाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण; चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
सनी देओलचा मुलगा करण बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून सनी त्याच्या मुलाला बॉलिवूडमध्ये आणत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सनी देओल करणार आहे. तसेच चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
 
 
 
 
 
चित्रपटात करण देओलसोबत अभिनेत्री साहेर बम्बाची मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक रोमॅण्टिक ड्रामा असून चित्रपटात सनीचा लहान भाऊ आणि अभिनेता बॉबी देओलही काम करतोय. झी स्टुडिओज आणि सनी साऊंड्स प्रा. लि. निर्मित ‘पल पल दिल के पास’ हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.