भारतीयांचा जपान मध्ये गौरव; उणे २५ डिग्रीत साकारली नरसिंहाची मूर्ती
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या तीन भारतीयांनी जपानमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आंतराष्ट्रीय स्नो स्कल्पटिंग स्पर्धेमध्ये भारतीयांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. उणे २५ डिग्री तापमानामध्ये बर्फापासून भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नरसिंहाची मूर्ती या स्प्र्रदेमध्ये तिघांनी साकारली. रवी प्रकाश, सुनील कुमार कुशवाहा आणि रजनीश वर्मा अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या संघाचे नाव ‘अभ्युदय टीम इंडिया‘ असे आहे.
 
 
 

 
 
 
‘अभ्युदय टीम इंडिया‘च्या फेसबुक पेजनुसार, तब्बल १९ वर्षानंतर भारतीयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. कठीण परिस्थितीमध्ये मूर्ती साकारणाऱ्या भारतीय संघाला प्रथम तर रशियाच्या संघाला दुसरे पारितोषिक मिळाले आहे. थायलंड संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आंतराष्ट्रीय स्नो स्कल्पटिंग स्पर्धेत दहा देशांनी सहभाग घेतला होता.
जपानमधील नायरोमध्ये ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अभ्युदय टीम इंडिया‘ने भगवान विष्णूची नरसिंह अवताराची प्रतिकृती साकारली होती. 
काय आहे आंतराष्ट्रीय स्नो स्कल्पटिंग स्पर्धा 
 
 
 
 
 
हिम वर्षामध्ये एखादी मुर्ती अथवा जबरदस्त कलाकृती तयार करावी लागते. ज्याची कलाकृती लवकर आणि उत्कृष्ट असेल अशा कलाकरांचा गौरव करण्यात येतो. ही स्पर्धा जपानमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होते.