गुंफण पदार्थाने जोडलेल्या मनांची
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
तुझ्यात जीव रंगला, गुंतला आहे. मी तुझ्या प्रेमात आहे, हे प्रेम समजून घ्यावयास, व्यक्त करावयास मनाला एक सवड हवी असते आणि व्यक्त करावयास धाडसही.... जे होत नाही पण कराव लागतं. आपले वडील, आई, बहीण वा कोणी खास त्यांच्या नजरेत नजर टाकून बोलायला थोडं धाडस लागतं ना! या धाडसाला थोडं पाठबळ म्हणजे हा ‘व्हॅलेंटाईन विक’ आहे. अवचित्यास निमित्त साधून आपण आपल्या माणसांना आनंदी करू शकतो. आपला वेळ उत्तम पदार्थ आणि समोरच्यांची आवड यांचा योग्य मेळ बसला की- मग सुरू होते ‘गुंफण!’ पदार्थाच्या रुचकर चवीने जोडलेल्या मनांची!
 
मी लहान असताना मला माझ्या आईच्या वागण्यातल रहस्य काही कळलेच नाही. एखादा खास पदार्थ तयार केला की- तो जास्तीचा करून विशिष्ठ व्यक्तीला डब्यात भरून पाठवायची, डबे पोहोचते करण्याचं काम खूपदा मला करावं लागायचं. त्यातही तो गरमा गरम पोहोचावा, असं तिच्या मनात असायचं. मला कधी कधी वैताग यायचा. मला काही फारसं पटलं नव्हतं, तेव्हा पण मी मोठी झाल्यावर स्वयंपाक करायला लागले आणि मलापण असं वाटायचं की- पदार्थ तयार करावा आणि आपल्या माणसांना डबा पोहोचता करावा. आपल्या जवळच्या माणसांचा आवडता पदार्थ आपल्या हाताने तयार करून भरवण्यात एक वेगळाच आनंद आहे. मायेने तयार करून या खास प्रसंगावर पोहोचतं करा मग ‘डबाभर प्रेम!’

 
 
‘बारबिक्युनेशन’ या सारख्या वेगवेगळ्याा रेस्टॉरेंटमध्ये आपल्या प्रियजनांना लंच वा डिनरला न्या आणि त्यांना आनंद द्या. विविध रंगांची उधळण करणार्‍या आठवड्याचा शेवट आपण आपल्या प्रियजनांच्या आवडीने केला तर संधीचे सोने होईल. दिनविशेष लक्षात घेता या रेस्टॉरेंटमध्ये आगळ्याा वेगळ्या थिम्स ठेवल्या जाते. वातावरण प्रसन्न आणि आल्हाददाई असते. आपण आपल्या आवडीची थिम त्यांना सांगू शकतो. ठराविक बजेटमध्ये पाहिजे तितके जेवण ही स्पेशालिटी घेऊन अनेक रेस्टॉरेंट आज आपल्याला दिसून येतात. त्यातील एक म्हणजे बारबिक्युनेशन आहे.
कबाब पार्टी : गुलाबी थंडीमध्ये या थिमचा आनंद खुलून दिसतो. या वाढत्या थंडीत गरमा गरम कबाब ज्यात, पनीर कबाब, मिक्स व्हेज कबाब यांचे विविध प्रकार यात आहेत. आपली माणसं आणि गरमा गरम कबाब या गुलाबी थंडीच्या गारव्यात गप्पा रंगत जातात.
 
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आपल्या माणसांना आपण वेळ कसा द्यावा, आणि घ्यावा, हे मात्र आपल्यावर अवलंबून आहे. या खाऊ गल्लीत जाण्याची संधी मिळाली तर नक्कीच या पदार्थांचा आस्वाद घ्या.
-प्रमोदिनी निखाडे