प्रेमदिवस
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
फेब्रुवारीचा महिना आला की- प्रत्येकाला वाट असते- ‘प्रेमदिवसाची!’ 14 फेब्रुवारी रोजी सर्वत्र लाल रंग पाहायला मिळत असून या रंगला प्रेमाचे प्रतीक सुद्धा मानले जाते. ‘टायटॅनिक,’ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ‘वीर-झारा’सारख्या चित्रपटातून आपल्याला हिट जोडी पाहायला मिळाली असून रोमँटिक चित्रपटात गाण्यावर विशेष लक्ष देण्यात येते. गाण्याला देखणे बनविण्यासाठी कलाकारांच्या आऊटफिट आणि लूकवर विशेष लक्ष देण्यात येते. चित्रपटात कलाकारांनी परिधान केलेले हे आऊटफिट आपल्याकडे असायला पाहिजे, असे अनेकांना वाटत असते. म्हणूनच यावेळेस मी तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध गाण्यामधील प्रसिद्ध आऊटफिटबद्दल सांगणार आहे.
 
 ‘प्यार किया तो डरना क्या’ ( मुघल -ए - आजम )
 
मधुबालाने परिधान केलेले अनारकली आज सुद्धा महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध गाणे ‘प्यार किया तो डरना क्या’मध्ये अनारकलीने हिरव्या रंगाचे अनारकली परिधान केले होते. तसेच अनारकली-सलीम जोडी आज सुद्धा प्रेक्षकांच्या मनात आहे. हिरव्या आणि लाल रंगांचे संयोजन असलेले हे आऊटफिट त्याच्या हटके लूकमुळे प्रसिद्ध झाले होते. तसेच आजसुद्धा फ्लोअर लेन्थ अनारकली महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. या चित्रपटात अनेक विविध आऊटफिट दाखविण्यात आले असून ‘जब प्यार किया तो’ गाण्यामध्ये परिधान केलेले अनारकली सर्वाधिक प्रसिद्ध झाले. सलीम-अनारकली वर आधारित अनेक मालिका आणि नाटक बनविण्यात आले असून यामध्ये सुद्धा कलाकारांचे आऊटफिट चित्रपटात परिधान केलेले आऊटफिटसारखेच ठेवण्यात आले.
 
 
 
‘मेहंदी लगा की रखना ’(दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे)
बॉलिवूडचा सर्वात रोमँटिक चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे!’ या चित्रपटात अनेक प्रसिद्ध संवाद ऐकायला मिळाले असून कलाकाराच्या फॅशनवर सुद्धा विशेष लक्ष देण्यात आले होते. तसेच चित्रपटातले प्रसिद्ध गाणे ‘मेहंदी लगा के रखना’मध्ये काजोलने परिधान केलेले हिरव्या रंगाचे धोती आणि कुर्ता आज सुद्धा महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. काजोलसह शारुख खानचे आऊटफिटसुद्धा त्याच्या हटके स्टाईलमुळे प्रसिद्ध झाले होते. चित्रपटात कलाकाराने परिधान केलेले इतर आऊटफिट आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.
 
‘तुम्ही देखो ना ’(कभी अलविदा ना कहेना)
रानी मुखर्जी आणि शाहरुख खान या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले. ‘कभी अलविदा ना कहेना’ चित्रपटातले ‘तुम्ही देखो ना ’ हे रोमँटिक गाणे विविध जागेवर शूट करण्यात आले. गाण्याला सुंदर बनविण्यासाठी विशेष तयारी करण्यात आले होते. रानीने परिधान केलेले शिफॉन साडी आजही महिलांमध्ये प्रसिद्ध आहे. लाल, हिरव्या, काळ्या आणि नारंगी रंगांची साडी या गाण्यात दाखविण्यात आली असून ही स्टाईलिश आणि बोल्ड साडी प्रत्येकाला शोभून दिसते.
 
‘दिवानी मस्तानी’ (बाजीराव मस्तानी)
दीपिका पदुकोण आपल्या स्टाईल आणि लूकसाठी प्रसिद्ध असून तिच्या प्रत्येक चित्रपटात आपलायला हटके आऊटफिट पाहायला मिळले. ‘राम लीला’ आणि ‘ये जवानी है दिवानी’मध्ये परिधान केलेले साडी आणि घागरा महिलांमध्ये प्रसिद्ध झाले असून आजसुद्धा या आऊटफिटची प्रशंसा सर्वत्र केले जाते. ‘बाजीराव मस्तानी!’ त्याच्यामध्ये वापरलेले भव्य सेट आणि आऊटफिट्समुळे प्रसिद्ध झाले. ‘दिवानी मस्तानी’ गाण्यात परिधान केलेले मस्तानी पॅटर्नची आताही क्रेझ कायम आहे. तसेच त्यावर परिधान केलेले दागिने सुद्धा प्रसिद्ध झाले. सोनेरी रंगाचे मस्तानी पॅटर्न आणि हिरव्या रंगाचे शरारा सध्या ट्रेिंडगमध्ये आहे.