मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तब्येत बिघडल्याने वाशीम दौरा रद्द; मुंबईला परतले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
वाशीम,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला वाशीम दौरा रद्द केला आहे. औरंगाबाद विमानतळावर उपचार घेऊन मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना झाले, देवेंद्र फडणवीस यांच्या आज बुलढाणा आणि वाशीम दौरा होता, मात्र बुलडाणा दौऱ्यावर असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आपला पुढील दौरा रद्द केला.
 
 
मुख्यमंत्र्यांना ॲसिडिटीच्या त्रासामुळे वाशीम दौरा रद्द करावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी बुलडाण्यावरून औरंगाबादला येऊन त्यांनी विमानतळावर वैद्यकीय उपचार घेतले. औरंगाबाद विमानतळावर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. प्रकृतीत सुधार आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सकाळी सिंदखेडराजासह अन्य तीन ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानंतर ते औरंगाबाद येथून विमानाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता त्यांचे स्वास्थ्य एकदम उत्तम आहे, कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळवले आहे.