नागपूर-भुसावळ दरम्यान अनेक गाड्या रद्द
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 

 
 
 
नागपूर, 
 
नागपूर-भुसावळ मार्गावर रेल्वे कोळसा प्रेषण आणि माल पथचे काम करण्यात येणार असल्याने या मार्गावर धावणारऱ्या अनेक पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
५१२६०/५१२५९ नागपूर-वर्धा-नागपूर (दररोज), ५१२८६/५१२८५ नागपूर-भुसावळ-नागपूर (दररोज), ५१२६२/५१२६१ वर्धा-अमरावती-वर्धा, ६८७५५/६८७५६ रामटेक-नागपूर-नागपूर मेमू (दररोज) या गाड्या १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
 
त्याचप्रमाणे ५१८२९ नागपूर-इटारसी पॅसेंजर १७ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत, ५१८३० इटारसी-नागपूर पॅसेंजर १६ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत, ५७१३६/५७१३५ अजनी-काजीपेठ-अजनी पॅसेंजर या गाड्या १५ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली.
याशिवाय १२१५९/१२१६० अमरावती-जबलपूर-अमरावती (दररोज) ही गाडी १६ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली. अमरावती येणारी गाडी ही नागपूरपर्यंत रद्द करण्यात आली. ही गाडी नागपूर-जबलपूर अशी धावणार आहे.