राशी भविष्य
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 

 • मेष : आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील. अपेक्षित व्यवहार पूर्ण होतील. गणेश स्तोत्र म्हणा.
 • वृषभ : आजचा दिवस दगदग, धावपळीचा आहे. संघर्ष करावा लागेल. सकाळी सूर्यनमस्कार घाला.
 • मिथुन : आज तुम्हाला तुमच्या कामांत अपेक्षित यश मिळेल, मात्र मेहनत घ्यावी लागेल. दत्ताची उपासना करा.
 • कर्क : व्यवसाय, नोकरीत संपर्कातून लाभ संभवतो. संपर्कात येणार्‍या व्यक्तीशी योग्य मसलत करा. मारोतीला शेंदूर लावा.
 • सिंह : आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जुनी दुखणी डोके वर काढतील. सकाळी गावाबाहेरच्या देवळांत पायी दर्शनाला जा. कन्या : जवळची माणसेच अनेकदा त्रास देतात, हा अनुभव येईल. मनस्ताप होईल. शीतला प्राणायाम करा.
 • तूळ : प्रवास कितीही कंटाळा आला तरीही करावाच लागणार आहे. दगदग होईल. संध्याकाळी एखाद्या एकट मंदिरात निवांत प्रार्थना करा.
 • वृश्चिक : मंगलकार्याच्या वाटाघाटीत सहभाग द्यावाच लागेल. तुमच्या म्हणण्याला मान राहील. नामस्मरणाला सुरुवात करा.
 • धनू : कौंटुबिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चही करावाच लागेल. भुकेलेल्याला जेवू घाला.
 • मकर : स्थावराचे व्यवहार अलबत समोर येतील आणि ते करावेच लागतील, मात्र त्यात लाभ होईल. वडिलांच्या नावाने पैसा दान करा.
 • कुंभ : तुम्ही आपल्या मूडमध्ये असताना कुणीतरी अचानक फसवणूक करेल. सावध रहा. हिरवा रंग तुम्हाला आज लाभदायक आहे.
 • मीन : तुमच्या मनात काही अन्‌ घडतेय्‌ काही, असा अनुभव घ्याल. स्त्रीवर्ग लाभ करून देईल. सरस्वती वंदना म्हणा.