Kangana Ranaut to Direct Her Own Biopic
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाद्वारे कंगना राणौतने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयासोबतच तिच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा झाली. सोबतच ती दिग्दर्शित करणार असलेल्या तिच्या पुढच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकताही वाढली. सध्या कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटात व्यस्थ आहे. पण हे दोन चित्रपट हातावेगळे करताच, कंगना एक नवा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. तो म्हणजे कंगना स्वत:चा बायोपिक दिग्दर्शित करणार आहे.

 
खुद्द कंगनाने हा खुलासा केला आहे. माझा पुढचा डायरेक्टोरिअल प्रोजेक्ट माझ्या स्वत:च्या आयुष्यावर बेतलेला आहे. पण हा स्वत:ला मोठे करण्याचा प्रयत्न नसून, माझा अख्खा प्रवास मी त्यातून दाखवू इच्छिते. माझ्या आयुष्यातील चढऊतार या चित्रपटात दिसतील. माझ्या अवतीभवती अनेक लोक आहेत, जे माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करतात. मला जज न करता, मला सोबत करतात, असे कंगना म्हणाली. ‘बाहुबली’चे पटकथा लेखक के. व्ही विजेन्द्र प्रसाद या चित्रपटाची पटकथा लिहणार असून कंगना हा चित्रपट दिग्दर्शित करेल. ‘मेंटल है क्या’ आणि ‘पंगा’चे काम संपल्यावर या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरु होईल. कंगनाच्या आयुष्यावरचे बायोपिक म्हटल्यावर निश्चिपणे या चित्रपटात हृतिक रोशन व अध्ययन सुमन, करण जोहर हे सगळे पात्र दिसतील.