इराणी कप; अक्षय कर्णेवारचे शतक ; विदर्भाला ९५ धावांची आघाडी
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाने इराणी करंडकावरही आपली पकड मजबूत केली आहे. शेष भारताला पहिल्या डावात 330 धावांमध्ये बाद केल्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात निर्णयाक आघाडी घेतली आहे. अखेरच्या फळीत अक्षय कर्णेवारचे शतक आणि संजय रामास्वामी- अक्षय वाडकरच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर विदर्भाने शेष भारताला बॅकफूटवर ढकलले आहे. पहिल्या डावात विदर्भाचा संघ 425 धावांवर बाद झाला असून पाहुण्या संघाला 95 धावांची आघाडी मिळाली आहे.
 
 
 
 
 
 
दुसऱ्या डावात विदर्भाचे 6 फलंदाज माघारी परतल्यानंतर अक्षय कर्णेवारने अक्षय वाडकरसोबत भागीदारी रचली. अक्षय वाडकरने 73 धावा ठोकले .  दुसऱ्या बाजूने अक्षय कर्णेवारने 133 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 102 धावांची खेळी केली. कर्णेवारचे स्थानिक क्रिकेटमधले हे पहिले शतक ठरले.