कर्जबाजारी पाकिस्तानला रोज भरावे लागते 11 अब्ज रुपये व्याज- इम‘ान खान
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
इस्लामाबाद 
 
 
पाकिस्तान कर्जाच्या बोझ्याखाली इतके दबले गेले आहे, की त्यातून बाहेर पडण्यासाठी फार मोठा काळ लागणार आहे. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानला दररोज 11,00,00,00,000 (अकरा अब्ज) रुपये व्याजापोटी भरावे लागत आहेत.
 
 
 
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम‘ान खान यांनी ही माहिती दिली आहे. मंगळवारी एका सरकारी कार्यक‘मात बोलत असताना त्यांनी सांगितले, की मागील सरकारने कर्जाचा एवढा मोठा डोंगर रचून ठेवला आहे, की आज देशाला कर्जापेक्षा व्याजच जास्त भरावे लागत आहे.
 
 
 
 
रेल्वे लाईव्ह ट्रॅकिंग सर्व्हिस आणि थल एक्स्प्रेस ट्रेन सेवेचे उद्घाटन केल्यानंतर इम‘ान खान बोलत होते. मागील सरकारवर दोषारोप करताना त्यांनी या कर्जाचे खापर त्याच्या माथी मारले आहे. 157 अब्ज रुपये गॅस सेक्टरवर खर्च केले जात आहेत आणि दर वर्षी सुमारे 50 अब्ज रुपये किमतीच्या गॅस साठ्याचा दुरुपयोग केला जातो असे त्यांनी सांगितले. रेल्वेसाठी एक अब्ज रुपयांची मशीनरी खरेदी करण्यात आली, जी पूर्णपणे निरुपयोगी आहेत. ओकारा आणि नारोवाल रेल्वे स्टेशन्सवर 400 ते 500 दशलक्ष रुपये एवढी प्रचंड रक्कम अकारण खर्च करण्यात आली असल्याचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी सांगितले. त्यांनी पूर्वीच्या रेल्वे विभागाच्या अन्यही अनेक त्रुटी दाखवून दिल्या.