मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
दुबई
 
 
 
 
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटाच्या कटामध्ये सहभागी असलेल्या मोस्ट वाँटेड आरोपीला अटक करण्यात आले. त्याच्यासह एका आरोपीला सुद्धा दुबईत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.  मोस्ट वाँटेंड आरोपीचे नाव अबू बकर असून, त्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ट्रेनिंग घेतले होते. तसेच आरडीएक्स आणण्यामध्ये त्याचे हात होते. दरम्यान, अबू बकरला झालेली अटक हे भारतीय तपास यंत्रणांना मिळालेले मोठे यश मानले जात आहे.
 मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बऱ्याच काळापासून मोस्ट वॉटेंड गुन्हेगारांच्या यादीत असलेल्या या दोन्ही आरोपींच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अबू बकरचे संपूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख आहे. तो मोहम्मद आणि मुस्तफा डोसासोबत तस्करीमध्ये सहभागी होता. अबू बकर याने सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आखाती देशांमधून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली होती.
अबू बकर याच्या विरोधात 1997 साली रेड कॉर्नर नोटीस जारी झाले होते. तेव्हापासूनच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर होता. अखेर आता त्याला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. अबू बकर याचे दुबईत अनेक उद्योग असून, त्याने एका इराणी महिलेशी विवाह केला आहे.