'हा' अभिनेता साकारणार सुनील गावस्कर यांची भूमिका
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
कबीर खानचा '८३' सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच तो कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमात लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी कलाकाराची शोध मोहीम सुरु होती ती अखेर संपली आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. या सिनेमात रणवीर सिंगनंतर ताहिर भसीनचे कास्टिंग करणे सगळ्यात कठीण गेल्याचे कबीर खान सांगतो.
 
कबीर खान म्हणाला, ''सुनील गावस्कर यांचे कास्टिंग आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होते कारण ते टीमचे सुपरस्टार होते. ताहिर या भूमिकेसाठी परफेक्ट आहे.''
 
 
कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे.
'८३' हा सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.