कोरा परीसरात पाचव्यांदा वाघाने साधली शिकार
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :14-Feb-2019
 परिसरातील नागरिकांमध्ये वाघा प्रति दहशत कायम
 
 त्वरीत वाघाच्या बंदोबस्त करण्याची मागणी
गिरड,
चंद्रपूर जिल्ह्यातिल ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोरा परिसरातील गावांमध्ये वाघाने पाचवी शिकार केली आहे.  ९ फेब्रुवारीला धामणगाव येथेशेजारील गोठ्यात शिरकाव करून वसंता आडे यांच्या १० बकऱ्यांना ठार केल्याची घटना घडली होती.
  

 
दोन दिवसांपूर्वी १२ फेब्रुवारीला खेक शिवारात शिरकाव करीत पहाटेच्या सुमारात कोरा येथिल विष्णू अभिमान लोखंडे यांच्या एका गायीचा फडशा पाडला होता या घटनेला दोन दिवस उलटत नाही तर पुन्हा या वाघाने जनावरे ठार करण्याच सत्र सुरच ठेलत आज पहाटेच्या दरम्यान खेक गाव शिवारात शिरकाव करीत खेक येथिल सुभाष नारनवरे यांच्या गावा शेजारी असलेल्या गोठ्यात शिरकाव करून तेथे बांधून असलेल्या जनावरांपैकी एका वासरावर हल्ला चढवित त्याला जागीच ठार केले.
 
या घटनेची माहीत मिळताच कोरा येथिल, वनसंरक्षक के. व्ही. शिंदे यांनी पंचनामा केला तर, डॉ.पी. एस. दोडके यांनी शवविच्छेदन केले. मंगरूळ कोरा परीसरात दिवसें-दिवस वाढत चाललेल्या वाघाच्या धुमाकूळापायी नागरिकांमध्ये चांगलीच भिती निर्माण झाली आहे. या वाघाचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.