झिम्बाब्वेमध्ये खाणीत 23 जणांचा मृत्यू- पुराचे पाणी शिरले
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
हरारे,
सोन्याच्या खाणीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने किमान 23 खाण कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. येथून आग्नेयकडे 145 किलोमीटरवर काडोमा येथील सध्या बंद असलेल्या खाणीमध्ये ही दुर्घटना घडली. बचाव पथकाकडून खाणीतील पुराचे पाणी पंपांद्वारे उपसले जात आहे.
 
 

 
 
पुरामुळे धरणाची िंभत मंगळवारी फुटली. त्यामुळे पुराचे पाणी या खाणीमध्ये घुसले, असे खाण कंपनीचे प्रवक्ते विल्सन ग्वाटिरिंगा यांनी सांगितले. या खाण कंपनीच्या काही खाणी या परिसरामध्ये आहेत. त्यापैकी काही काळापासून बंद असलेल्या खाणीत ही दुर्घटना घडली आहे. मात्र मानवतेच्या दृष्टिकोनातून कंपनी बचाव कार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.