मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १८ फेब्रुवारीला गडचिरोलीत विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
गडचिरोली,
जिल्ह्यात गेल्या साडेचार वर्षात पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण व नव्याने मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते, परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
 
 
 
यावेळी चामोर्शी तालुक्यातील चिंचडोह सिंचन प्रकल्प, कृषी महाविद्यालयाची इमारत व कठाणी नदीवरील पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
 
तसेच कोटगल सिंचन प्रकल्पाचे व इतर विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आले आहे.