प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पांढरकवड्यात
   दिनांक :15-Feb-2019
 
 
 - स्वयंसहायता समूह महिलांचा महामेळावा
 
 
पांढरकवडा,
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, १६ फेब्रुवारी रोजी पांढरकवडा येथे सकाळी १० वाजता स्वयंसहायता समूह (बचत गट) महिलांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 

 
 
 
या महामेळाव्यात महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री मदन येरावार, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे व यवतमाळ जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
 
 
 
या कार्यक्रमात खासदार भावना गवळी, खासदार राजीव सातव, आमदार डॉ. अशोक उईके, आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, आ. राजेंद्र नजरधने, आ. राजू तोडसाम, आ. मनोहर नाईक, आ. ख्वाजा बेग, आ. डॉ. वजाहत मिर्झा, आ. ॲड. निलय नाईक यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.