मलकापूरचे संजय भिकमसिंह राजपूत शहीद
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
मलकापूर:
जम्मू काश्मिरातील पुलवामा जिल्ह्यात आज गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यात जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी वाहन घुसवून घडवलेल्या आत्मघातकी स्फोटात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या शहिदांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे राहणारे संजय भिकमसिंह राजपूत वय 40 हे सुद्धा शहीद झाले.
शहरातील लखानी प्लॉट विवेकानंद आश्रम माता महाकाली नगर मध्ये त्यांचे रहाते घर असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलं, दोन भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर झालेल्या या हल्याच्या विरोधात सर्वत्र तीव्र भावना प्रकट होत आहेत.