एकच नारा; पाकिस्तानला ठेचून मारा
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
 
-वर्ध्यात वीर जवानांना श्रद्धांजली.
 
 
 
 
वर्धा,
जम्मू-काश्मिरातील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या क्रूर हल्ल्याचा वर्धेतील सोशालिस्ट चौकात पाकिस्तानचा पुतळा जाळून निषेध आणि वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 
काल पुलावामात पाकपूरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे ४२ जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा वर्धेत विविध सामाजिक संघटनानी एकत्र येऊन तीव्र शब्दात निषेध केला पाकला त्यांच्या भाषेत उत्तर दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
 
यावेळी पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच, पाकिस्तान मुर्दाबाद, अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे, अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बिगुल वाजवून सैनिकी नियमानुसार माजी सैनिक संघटनेच्या नेतृत्वाखाली दोन मिनिटे मौन राहून वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, माजी सैनिक कल्याण संघटना, ऑल इंडिया एक्स बीएसएफ संघटना, जयहिंद फाउंडेशन, पतंजली, वैद्यकीय जणजागृत मंच, जनहित मंच, प्रहार संघटना, सेवा निवृत्त पोलीस सांघटना, वर्धा सोशल फोरम, स्वामी समर्थ महिला मंडळ यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.