विविध संस्थांतर्फे शहीदांना श्रद्धांजली, पुतळ्यांचे दहन
   दिनांक :15-Feb-2019
 
भाजपा व माजी सैनिकांतर्फे अतिरेक्यांचा तीव्र निषेध, पुतळ्याचे दहन 
 
 
 
 बुलढाणा,
जम्मू काश्मिरातील पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या ताफ्यात जैश ऐ मोहम्मदच्या अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला. या स्फोटात शहीद झालेल्या जवानांनामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत तसेच लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील शहीद जवान नितीन राठोड यांना भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय, माजी सैनिकांतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी अतिरेक्यांचा तिव्र शब्दात निषेध करून पुतळयाचे दहन करण्यात आले. भारत माता की जय, पाकीस्तान मुर्दाबाद, शहीद जवान अमर रहेचा जयघोष करण्यात आला.
 
 
कारंजा येथे शहीदांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
 
 
 
कारंजा येथील जयस्तंभ चौकात भारतीय जनता पार्टी, पोलिस दल व सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करुन निषेध व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
 
 
 
दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघातर्फे शहिदांना श्रद्धांजली 
 
दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने विश्राम गृह येथे झालेल्या बैठकीमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेमुळे सर्व जनता दुःखाच्या डोंगराखाली आली आहे सर्वसामान्य नागरिकांमधून या हल्ल्याचा निषेध होत आहे तर भारतीय जवानांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाच्या वतीने या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी अध्यक्ष वसंतराव देशमुख सचिव लक्ष्मीकांत नंदनवार यांचेसह राजाभाऊ गांजेगावकर , संतोष मुडे , अरविंद ओझलवार , दत्ता काळे , प्रशांत भागवत , डॉ . अनिल काळबांडे , विशाल माने , अझरउल्ला खान आदी उपस्थित होते
 
शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता उद्या  दि . १६ फेबुवारी रोजी उमरखेड बंदची हाक देण्यात आली आहे .
 
तसेच अन्य विविध संघटनांनी घटनेचा निषेध केला