पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात; अमेरिकन तज्ज्ञांचे मत
   दिनांक :15-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
वॉिंशग्टन
 
 
 
40 जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयचा हात असण्याची शक्यता मुळीच नाकारला येत नाही, असे मत अमेरिकन तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागात कार्यरत असलेल्या अधिकार्‍यांच्या मते, या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली असली, तरी हा कट तयार करताना आयएसआयने जैशला आवश्यक ती मदत केली असल्याची दाट शक्यता आहे. जैशने स्वत:हून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याने, बर्‍याच गोष्टी आपोआपच समोर येत आहेत.
 
 
या हल्ल्यामुळे नवनिर्वाचित पंतप्रधान इम‘ान खान यांच्या प्रशासनापुढेही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जैशच्या कबुलीमुळे पाकिस्तानची भूमी दहशतवादी गटांना आश्रय देणारी असल्याचे आणि याच भूमीतून भारतविरोधी कारवाया केल्या जात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे आमच्या भूमीत अतिरेक्यांना आश्रय दिला जात नाही, असा दावा आता पाकिस्तान सरकार कदापि करू शकत नाही, असेही तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.