मसुदच्या बचावासाठी चीन पुन्हा सरसावला
   दिनांक :15-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 बीजिंग;  
 
 
पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसुद अझहरच्या बचावासाठी चीन पुन्हा एकदा समोर आला आहे. मसुदला जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याच्या भारताच्या प्रस्तावाला आम्ही कदापि समर्थन देणार नाही, अशी भूमिका चीनने आज शुक‘वारी घेतली.
 
 
भारताच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मोठा धक्का आम्हाला बसला आहे, या हल्ल्याचा आम्ही तीव‘ निषेध करतो, असे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्याचवेळी त्यांनी, मसुदच्या मुद्यावर आमची भूमिका अजूनही कायम आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही, असेही स्पष्ट केले.