विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला आव्हान
   दिनांक :15-Feb-2019
लंडन,
९४०० कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी भारताला हवा असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आज शुक्रवारी त्याच्या प्रत्यार्पण आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
 
 

 
 
 
विशेष न्यायालयाने मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करणारा निकाल दिल्यानंतर ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने या आदेशावर अलीकडेच स्वाक्षरी केली होती. सोबतच त्याला आव्हान याचिका दाखल करण्यासाठी १४ दिवसांची मुदतही दिली होती. उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय विभागाकडे मल्ल्याने ही याचिका दाखल केली असून, दोन ते चार आठवड्यांच्या आत त्यावर निकाल लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
 
उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावल्यास पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय त्याच्यापुढे राहणार आहे. या प्रक्रियेत त्याला ३० मिनिटांचा युक्तिवाद करण्याची परवानगी राहील. यात त्याला भारताचा दावा असत्य असल्याचे सिद्ध करावे लागेल.