' सैराट ' सिनेमावर बनणार मालिका
   दिनांक :15-Feb-2019
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मराठीतील गाजलेला चित्रपट  'सैराट' ने  मराठी रसिकांसह बॉलीवुडवरही जादू केली होती. रसिकांप्रमाणेच सैराटची भुरळ बॉलीवुडलाही पडली. यामुळे दिग्दर्शक करण जोहरने सैराटचा रिमेक बनविण्याचे ठरवले आणि धडक हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला. आजही 'सैराट' सिनेमाची जादू कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुन्हा सैराटचे आणखीन एक व्हर्जन रसिकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. सैराट सिनेमा आता घरबसल्या रसिकांना अनुभवता येणार आहे. होय, सिनेमावर आधारित मालिका रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहेत.
सैराटवर बनविण्यात येणा-या मालिकेची स्टारकास्टही फिक्स करण्यात आल्याचे समजतंय. त्यानुसार टीव्ही अभिनेता कमल नारायण राजवंशी या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या बोलले जात आहे. तर मालिकेत रिंकुने साकारलेली आर्ची आणि आकाश ठोसरने साकारलेली परश्या भूमिकेसाठी नवीन चेहऱ्याचे शोध चालू आहे.