चोरपांगाऱ्याच्या नितीन राठोडला वीरमरण
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
बुलडाणा -
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड यांना वीरमरण आले आहे. ते ३६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ, बहिण तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
या दहशतवादी हल्ल्यात जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे