रिसोडमध्ये पाणी टंचाईस सुरुवात
स्रोत: Tarun Bharat, Nagpur   दिनांक :15-Feb-2019
 
 

 
 
रिसोड,
उन्हाळा पूर्णपणे लागला नसला तरी, तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. लोक आत्तापासूनच दूरवरून पाणी आणत असल्याचे चित्र पुष्कळ ठिकाणी पाहायला मिळत आहे. शासनाकडून सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या काही दिसून येत नाही.
 
मात्र, यातच रिसोड शहराला पाणीपुरवठा ज्या धरणातून होतो तिथून शहरापर्यंत टाकण्यात आलेल्या पाईपलाईन वर विविध ठिकाणी उभ्या केलेल्या वाल्व मधून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. अढळ धरण ते रिसोड पर्यंत टाकण्यात आलेली पाईप लाईनवर अशे कित्येक वाल्व आहेत, ज्यातून कमी-जास्त प्रमाणात लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हा खूपच चिंतेचा विषय आहे.
 
 
 
याविषयी वेळोवेळी प्रसारमाध्यमांनी बातम्या प्रकाशित करून सुद्धा आतापर्यंत याकडे लक्ष देण्यात आलेले नाही. रिसोड पासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या हराळ फाट्यानजीक असलेल्या वाल्व मधून धो धो पाणी वाहत आहे.ये जा करणाऱ्या लोकांना पाणी स्प्रिक्लर मधून उडत असल्याचे भान होते. वाल्वच्या आजूबाजूला मोठे तळे साचल्याचे दिसते. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची मागणी खूप वाढत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वरील लिकेज बंद केल्यास दररोज लाखो लिटर पाण्याची बचत होऊ शकते.