दिग्रसला सर्व धर्मियांचा निषेध मोर्चा- शाळा महाविद्यालय व बाजारपेठ स्वयंस्पुर्तीने बंद
   दिनांक :16-Feb-2019
दिग्रस -
जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सिआरपीएफचे ४१ जवान शहीद झाले या घटणेच्या निषेधार्थ, आज संपूर्ण दिग्रस शहराने कडकडीत बंद पाळला.

 
 
 
शहिदाना श्रद्धांजली व भ्याड हल्ल्याचा येथील सर्व धर्मियांनी निषेध म्हणून मोर्चा काढला, हजारो नागरिकांनी पाकिस्तानी कारवाईचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पाकीस्थानचा ध्वज जाळून आपल्या भावना व्यक्त करीत 'भारत माता की जय ' च्या जयघोषात येथील शिवाजी चौक येथून निघालेले मोर्चेकरु शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करित वापस शिवाजी चौक येथे आलेत. शहिदांना सामुहिक श्रध्दांजली राष्ट्रगिता नंतर मोर्चा विसर्जीत झाला. दरम्यान येथील सर्व शाळा महाविद्यालय, बाजारपेठ व सर्व दुकानदारांनी स्वयंस्पुर्तीने बंद पाळला.
 
 
आयोजीत निषेध मोर्चा हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व धर्मिय व भारतीयांचा असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या सकाळी ११ वाजता सामुहिक निषेध नोंदविला मात्र आज शनिवार बाजाराचा दिवस असतांना सुध्दा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.