राष्ट्रीय हॉकी शिबिरासाठी 34 खेळाडूंची निवड
   दिनांक :16-Feb-2019
नवी दिल्ली
या मोसमाची पहिली आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा मलेशियाच्या इपोह येथे होणार आहे. सुल्तान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी हॉकी इंडियाने बंगळुरुच्या साई केंद्रात आयोजित राष्ट्रीय वरिष्ठ गट पुरुष हॉकी शिबिरासाठी 34 खेळाडूंची निवड केली आहे. सुल्तान अझलान शाह चषक स्पर्धा 23 मार्चपासून प्रारंभ होणार असून त्याकरिता राष्ट्रीय संघाचे हॉकी शिबिर 18 फेब्रुवारीपासून सुरु होईल. हॉकी इंडियाने गत डिसेंबर महिन्यात हॉकी विश्वचषकात खेळलेल्या भारतायी संघातील सर्व 18 खेळाडू कायम ठेवले असून महिना भर चालणार्‍या या शिबिराचा समारोप 18 मार्च रोजी होणार आहे.