america 70 mp supports india
   दिनांक :16-Feb-2019
वॉशिंग्टन , 
पुलवामातील आत्मघाती हल्ला हा भारतावर आघातच आहे. या हल्ल्यामुळे भारताने कदापि डळमळू नये. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, दहशतवादविरोधात आता संपूर्ण निर्धाराने लढा द्या, अशी भूमिका अमेरिकेतील 70 पेक्षा जास्त खासदारांनी विशद केली आहे. यात 15 सिनेट सदस्यांचाही समावेश आहे. 
 
 

 
 
 
भारत अशा भ्याड हल्ल्यांना घाबरणारा देश नाही. अमेरिकन सरकार आणि येथील जनतेचा भारताला संपूर्ण पाठिंबा आहे. दहशतवाद्यांना सफाया करून, आपल्या लोकशाहीचे रक्षण करण्याच्या भारताच्या अधिकाराचेही आम्ही समर्थन करतो, असे सिनेट सदस्य थॉम टिलिस यांनी सांगितले.
 
 
अमेरिकेच्या सशस्त्र सेवा समितीचा सदस्य या नात्याने, भारत आणि अमेरिकेतील राष्ट्रीय सुरक्षा सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेेही त्यांनी स्पष्ट केले. सिनेट आणि कॉंगे‘स सभागृहातील अन्य सदस्यांनीही या लढ्यात भारताचे समर्थन केले आहे.